Government employees : दिनांक १७.०३.२०२३ रोजी विभागीय आयुक्त सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सर्व यांना राज्य सरकारी कर्मचारी यांच्या संपाबाबत दाखल झालेल्या PIL १५० / २०१४
मधील अंतरिम अर्ज क्रमांक-२३९४ /२०२३ नुसार संपात सहभागी कर्मचाऱ्यांची महिती मागविण्यात आली आहे.
जुनी पेन्शन योजना अंदोलन
बृहनमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी जुनी पेन्शन योजना सुरु करणे व अन्य मागण्यासाठी दिनांक १४.३.२०२३ रोजी पासून बेमुदत संप सुरु केला आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
सदर संपाच्या अनुषंगाने डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी मा.उच्च न्यायालय,मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली आहे.या जनहित याचिकेत आज दिनांक १७.३.२०२३ रोजी सुनावणी घेण्यात आली असून पुढील सुनावणी दिनांक २३.३.२०२३ रोजी ठेवण्यात आलेली आहे.
Old pension updates
या जनहित याचिकेच्या अनुषंगाने मा.महाधिवक्ता (Advocate General) महाराष्ट्र राज्य यांना शनिवार दिनांक १८.०३.२०२३ रोजी दुपारी ०१:०० वाजता त्यांचे मा.उच्च न्यायालय,मुंबई येथील दालनामध्ये खालील माहिती उपलब्ध करुन द्यावयाची आहे. त्याकरिता खालील मुद्यांची माहिती आजच या विभागास सादर करण्यात येणार आहे.
- दिनांक १४.३.२०२३ ते १७.३.२०२३ पर्यंत तारखेनिहाय एकुण कर्मचारी संख्या किती, त्यापैकी किती कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत,किती कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर आहेत व किती कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते.
जुनी पेन्शन नाही पण या कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली मोठी वाढ
- सदर कर्मचारी संपावर गेल्यामुळे कोणकोणत्या सेवांवर त्यांचा दुष्परिणाम झालेला आहे.
- सदर कर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयात काय काय अडचणी आलेल्या आहेत.
- सदर कर्मचारी संपावर गेल्यामुळे त्यावर पर्यायी व्यवस्था अथवा उपाययोजना काय करण्यात आली किंवा कसे ?
- सदर कर्मचारी भविष्यात संपावर गेलेतर त्यावर काय उपाययोजना करण्यात येणार आहे.
- संप कालावधीत कोणकोणत्या सेवा देण्यात येत आहे किंवा कसे?
जुनी पेन्शन संदर्भात नवीन शासन परिपत्रक येथे पहा