pension : जुना पेन्शन योजना चा लाभ दिल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन सह निवृत्ती वेतन भत्ता सुध्दा मिळणार आहे. सविस्तर माहिती.
Pension Allowance updates
संबधित महत्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर राजस्थान राज्यातील सरकारी कर्मचारी संदर्भात घेतला आहे. आता राज्य कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेतील 28 वर्ष ऐवजी आता 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या नंतर सेवानिवृत्ती घेतल्यास पूर्ण पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 6 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आला आहे.
कुटुंब निवृत्ती वेतन भत्ता मिळणार!
1 एप्रिल 2023 पासून या निर्णयानुसार निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे दरमहा 12 हजार 500 रुपये पर्यंत उत्पन्न असले तर सदस्यांनाही कुटुंब निवृत्ती वेतन लाभ मिळणार आहे. या बरोबरचे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांने वयाचे 75 वर्ष पूर्ण केल्यावर पेन्शनधारक किंवा त्यांच्या कुटुंबांना 10 % अतिरिक्त निवृत्तीवेतन भत्ता दिला जाणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… यांचा वाढला घरभाडे भत्ता