Mahashivaratri 2023: हिंदू धर्मात भगवान महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव हे अत्यंत प्रेमळ आणि दयाळू देव आहेत. दर महिन्याला येणार्या मासिक शिवरात्रीसोबतच वर्षात येणार्या महाशिवरात्रीलाही विशेष महत्त्व आहे.
महाशिवरात्र शुभ मुहूर्त
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात.
भीतीपासून मुक्ती मिळते, शिवाच्या कृपेने आरोग्य प्राप्त होते, सुख-सौभाग्य वाढते.महाशिवरात्री हा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो.
- रात्रीच्या पूजेची वेळ – 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.52 वाजेपासून ते रात्री 12.42 वाजेपर्यंत
- पहिला प्रहर – 18 फेब्रुवारी 2023, सायंकाळी 6.40 वाजेपासून ते 9.46 वाजेपर्यंत
- दुसरा प्रहर – रात्री 9.46 वाजेनंतर
- तिसरा प्रहर – 19 फेब्रुवारी 2023, रात्री 12. 52 वाजेपासून ते पहाटे 3.59 वाजेपर्यंत
- चौथा प्रहर –19 फेब्रुवारी 2023, पहाटे 3.39 वाजेपासून ते सकाळी 7:05 वाजेपर्यंत
महाशिवरात्री व्रत साहित्य
अभिषेकानंतर लावून बेलपत्र, धतुरा, शमी पत्र 7, मदार, अत्तर,धतुरा, बेलपत्र 108
कमळ गट्टे पाच, प्रकारची फळे, गोड सुपारी 2, उसाचा रस, फुले आणि काळे मिरे 25 , तांदूळ 108, काळे मिरे 21,काळे ती मध, साखर, शुद्ध तूप, दही, दूध, भस्म , चदन, मिठाई, लवंग 1 ,पिवळे चंदन ,धूप-दीपधूप-दीप , गुलाब फुल 7, गहू दाने 21, धोत्रा फुल, आष्टगद
आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा. या दिवशी प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार शंकराच्या पिंडीवर बेलचे पान अपर्ण करतो. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्वं आहे.
शिवरात्रीचे महत्त्व काय?
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्राकृत रूपात आले, शिवाचे ज्योतिर्लिंग रूप साकार झाले. याशिवाय माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह शिवरात्रीला झाला होता असं म्हणतात की मंदिरातील प्रत्येक शिवलिंगांमध्ये भगवान शिव वास करतात.
शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भगवान शिव आणि माता पार्वतीची यथायोग्य पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते. शिव त्रयीच्या दिवशी व्रत व उपासने केल्याने मनुष्याचे दुःख इत्यादी दूर होतात व महादेवाच्या आशीर्वादाने मनोकामना पूर्ण होतात.
महाशिवरात्री पुजा विधी पाहण्यासाठी इथे क्लिक करा