Juni pension : खुशखबर.. या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार! DCPS NPS रक्कम होणार GPF खात्यात वर्ग; मा.उच्च न्यायालयाचे आदेश

Juni pension : महाराष्ट्र राज्याने दिनांक 31/10/2005 च्या शासन निर्णयाद्वारे 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या सर्व सरकारी नोकरांना DCPS योजना लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

जुनी पेन्शन योजना लागू होणार! 

दिनांक 02/08/2005 च्या जाहिरातीनुसार ग्रामसेवक पदासाठी अर्ज केला होता,आणि त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली होती.निवड यादी सप्टेंबर,2005 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली, परंतु याचिकाकर्त्यांना 01/11/2005 नंतर नियुक्तीचे आदेश देण्यात आले.

दि.13/04/2005 व दिनांक 18/08/2005 च्या जाहिरातीनुसार काही शिक्षण सेवकांना नियुक्त करण्यात आली होती.त्यांची नियुक्ती दपद भरण्यासाठी जाहिरातीनुसार अर्ज केला होता. परंतु त्यांची नियुक्ती 01/11/2005 नंतर झाली होती.

Old pension scheme benefits

ग्रामसेवक,शिक्षण सेवक भरती प्रक्रिया 01/11/2005 पूर्वी सुरू झाली होती.भरतीमध्ये निवड प्रक्रिया समाविष्ट असते.सध्याच्या याचिकांमध्ये 01/11/2005 नंतर नियुक्त्या झाल्या असल्या तरी, जाहिरात प्रसिद्ध करून निवड प्रक्रिया 01/11/2005 पूर्वी सुरू झाली.

हे पण पहा ~  Juni pension : जुनी पेन्शन लागू करणे सामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारणे - मा.आरबीआय गव्हर्नर

मा.उच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की,सर्व रिट याचिकांमधील सरकारी कर्मचाऱ्यांना “जुनी पेन्शन योजना” आणि “सामान्य भविष्य निर्वाह निधी” लाभ देण्यात यावा जो, 01/11/2005 पूर्वी प्रचलित होता.

मा. उच्च न्यायालयाने असे आदेश दिले आहे की, या सरकारी कर्मचाऱ्यांना 31/10/2005 च्या GR द्वारे सादर केलेल्या नवीन DCPS योजना लागू होणार नाही.याचिकाकर्त्यांचे DCPS मध्ये योगदान त्यांच्या GPF खात्यात जमा करावे.

जुनी पेन्शन योजना मा. उच्च न्यायालय आदेश येथे पहा – जुनी पेन्शन आदेश

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d bloggers like this: