Old pension : मोठी बातमी…जुनी पेन्शन योजना लागू होणार! कर्मचारऱ्यांनी शासनाला द्यावा थोडा वेळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Pension  : शासकीय कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढला होता.त्यानंतर पुन्हा एकाद जुन्या पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे.त्यातच विधान परिषद निवडणुकीत जुन्या पेन्शनचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता.

Old Pension latest news

जुनी पेन्शन योजना बाबत (OPS) आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Juni pension yojana

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला असता,राज्यात लवकरच 30,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.कालबाह्य पेन्शन योजने चा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र

शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित त्रैवार्षिक सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे.

हे पण पहा ~  Juni pension : खुशखबर.. या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार! DCPS NPS रक्कम होणार GPF खात्यात वर्ग; मा.उच्च न्यायालयाचे आदेश

प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

होळी सणाला कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट! पहा किती पगार वाढणार

पगार वाढ अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment