State employees : सरकारी कार्यालयीन कामकाज विनाविलंब पार पाडण्यासाठी पुढीलप्रमाणे निर्णय प्रक्रिया विहीत करण्यात आली आहे.शासकीय कामकाज पारदर्शक,गतीमान होणार असून वेळेचा अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.
शासकीय कामकाजात ई-ऑफीस प्रणालीचा वापर करावयाचा आहे.क्षेत्रीय कार्यालयातदेखील टपाल स्विकृतीसाठी मध्यवर्ती ई-टपाल केंद्राची निर्मिती करणे आवश्यक आहे.
शासकीय कार्यालय कार्यपद्धती 2023
१) अधिनियमातील तरतुदीनुसार दुय्यम अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेल्या अधिकारांची यादी त्वरित प्रसिध्द करण्यात येईल.
२) मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व इतर शासकीय कार्यालये यांनी निर्णयार्थ फाईल / नस्ती सादर करण्याच्या कार्यपध्दतीचे पुनर्विलोकन करावे व त्यामध्ये गतीमानतेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बदल मान्यतेसाठी कार्यालय प्रमुख / विभागप्रमुखांकडे प्रस्तावित करण्यात येईल.
३) प्रत्येक विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या मान्यतेने संबंधित विभाग / कार्यालयाने प्रकरण /फाईल / नस्ती निर्णयार्थ सादर करण्याकरिता तीन स्तर निर्धारित करावेत.परंतु मंत्रिमंडळ टिप्पणी आणि धोरणात्मक निर्णयाचा समावेश असलेल्या बाबी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी तीनपेक्षा अधिक स्तर ठेवण्यात येईल.
४) अधिकाऱ्यांच्या साखळीमधील अधिकारी यांना फाईल / नस्ती निर्णयार्थ सादर करण्याचे टप्पे कमी करण्यासाठी शक्य तेथे सादरीकरणाकरिता विषय नेमून देण्यात यावेत.
५) प्रशासकीय विभागांना क्षेत्रीय कार्यालयांतून व नागरिकांकडून प्राप्त होणारे दैनंदिन टपाल मंत्रालय मध्यवर्ती टपाल केंद्र येथे ई-मेल / ई- ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून स्विकृतः करुन ते मध्यवर्ती टपाल केंद्रातून संबंधित विभागांच्या नोंदणी शाखेमार्फत संबंधित विभागातील कार्यासनांना पाठविण्याबाबतची कार्यपध्दती विशद करण्यात आली आहे.
शासकीय कामकाज पारदर्शक,गतीमान होणार असून वेळेचा अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.तसेच शासकीय कामकाजात ई-ऑफीस प्रणालीचा वापर करावयाचा आहे.क्षेत्रीय कार्यालयातदेखील टपाल स्विकृतीसाठी मध्यवर्ती ई-टपाल केंद्राची निर्मिती करणे आवश्यक आहे.
सरकारी कर्मचारी कर्मचारी कार्यपद्धती शासन निर्णय येथे डाऊनलोड करा