Gratuity news : नुकतच सरकारी कर्मचाऱ्यांना जे एनपीएस धारक आहेत त्यांच्यासाठी ग्रॅच्युइटी आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे तर मित्रांनो हे कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि ग्रॅच्युइटी रुणतानिधी हे कसा ठरतो ग्रॅच्युइटी नेमकी किती भेटते या संबंधित माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
ग्रॅच्युइटीची रक्कम केव्हा मिळते?
ग्रॅच्युइटी वेतन कायदा १९७२ नुसार ग्रॅच्युइटीची रक्कम जास्तीत जास्त २० लाख रुपयांपर्यंत असू शकते. ग्रॅच्युईटीसाठी कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत किमान ५ वर्षे काम करणे बंधनकारक आहे.
कमी कालावधीत केलेल्या नोकरीच्या स्थितीत कर्मचारी ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरत नसतात.सलग ४ वर्षे ११ महिन्यांत नोकरी सोडल्यानंतरही ग्रॅच्युइटी मिळत नाही. मात्र, नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू किंवा अपघात झाल्यास हा नियम लागू होत नाही.
ग्रॅच्युइटी वेतन कायदा १९७२
१. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी १९७२ मध्ये ग्रॅच्युइटी वेतन कायदा लागू करण्यात आला.
२. या कायद्यात सर्व प्रकारच्या खाजगी कंपन्या, खाण क्षेत्र, कारखाने, तेलक्षेत्र, वनक्षेत्र आणि ज्या बंदरांमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात अशा सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
३. ग्रॅच्युइटी आणि प्रॉव्हिडंट फंड पूर्णपणे वेगळे आहेत.
४. ग्रॅच्युइटीमध्ये संपूर्ण पैसे कंपनी देते.त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीतील १२ % योगदानही कर्मचाऱ्याचेच असते.
Gred – 1 -ग्रॅच्युइटी पेमेंट कायदा १९७२ च्या कक्षेत येणारे कर्मचारी
Gred – 2- ग्रॅच्युइटी पेमेंट कायदा १९७२ अंतर्गत समाविष्ट नसलेले कर्मचारी
ग्रॅच्युइटीची रक्कम ठरविण्याचे सूत्र – अंतिम वेतन कालावधी 15/26
Gratuity and family pension
नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याने कामात निष्काळजीपणा केल्यास निवृत्तीनंतर त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा आदेश केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू राहील. आगामी काळात वेगवेगळ्या राज्य सरकारांकडूनही त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.