Employees leave : खुशखबर… ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना 10 मे रोजी फुल पगारी सुट्टी! शासन निर्णय दि. 2/5/2023

Employees leave : आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे.ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा,१९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.

Leave for state employees

भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२३ चा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदर निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक १० मे २०२३ रोजी होणार आहे. कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत.

कर्नाटक राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी आदेश देण्यात येत आहेत.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

Employees Leave for voting

निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी / कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

हे पण पहा ~  Pan card link सावधान.. खोट्या पॅन कार्ड लिंक मेसेज पासून लगेच व्हा सावध; नाहीतर बॅंक खाते होईल रिकामे!

सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू राहील.

State employees leave news

अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कर तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

 खुशखबर..कर्मचाऱ्यांना मिळणार 5 दिवसांचा आठवडा;

Five day’s weeks

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

सुट्टी शासन निर्णय येथे डाऊनलोड कराकर्मचारी सुट्टी

महागाई भत्ता वाढ आकडेवारी बदलली, पहा नवीन अपडेट्स

DA hike calculation

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d