Ration card updates : मोठी बातमी…रेशनकार्ड धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RaRation card update : गरीबांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने चा कालावधी एक वर्षासाठी म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत वाढवला.त्यासाठी 2 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे.गरिबांना महागाईपासून काहीसा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

Pradhanmantri Garib Kalyaan Yojana

केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात ही योजना सुरू केली होती.2020 मध्ये केंद्र सरकारने,राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या( एनएफएसए) अंतर्गत सर्व लाभार्थीना,पीएम गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या काळासाठी,प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 2022

रेशन कार्डधारकांसाठी मोदी सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत “पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सध्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळते.यामध्ये तांदूळ किंवा इतर कोणतेही भरड धान्य 3 रुपये किलो,गहू 2 रुपये किलो आणि हरभरा किंवा इतर कोणतेही भरड धान्य 3 रुपये किलो दराने दिले जाते.

हे पण पहा ~  Free Ration : खुशखबर... डॉ आंबेडकर जयंती व गुढीपाडवा निमित्ताने मोफत रेशन मिळणार! पहा शासन निर्णय व लाभार्थी

मोदी मंत्रिमंडळाच्या या ताज्या निर्णयानंतर लाभार्थ्यांना हे धान्य मोफत मिळणार आहे.सध्या मोफत धान्य देण्याची ही योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजेच एका वर्षासाठी लागू आहे.या योजनेवर केंद्र सरकार सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लाभार्थी येथे पहा

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती  देताना केंद्रीय वाणीज्यमंत्री पियुष गोयल म्हणाले की,”अन्न संरक्षण कायद्यानुसार गरीबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.परंतु त्याचा सर्व भार केंद्र सरकार उचलणार आहे.लाभार्थीना अन्नधान्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सरकारवर आधीच सबसिडीचा दबाव असला तरी ही योजना वाढवल्याने सरकारवर 45 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा होता.अर्थ मंत्रालयाने इतरांच्या रकमेत कपात करण्याची सूचना केली असली तरी सध्या ही योजना मोदी सरकारने 3 महिन्यांसाठी वाढवली होती.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment