Employees promotion : सरकारी कर्मचारी पदोन्नती संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित दि.15/6/2023

Employees promotion : दि. ०१.१२.२०१२ रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये केंद्र प्रमुखांची 50 % पदे पदोन्नतीने व 50 % पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या काट्याच्या मर्यादित भरण्यात येणार आहे. या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

केंद्रप्रमुख व इतर पदोन्नती अपडेट्स

उपरोक्त विषयास अनुसरुन उप सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या कडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना कळविण्यात आले आहे की, मा. मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १४.०६.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत शिक्षक संवर्गाची विविध टप्प्यातील पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. 

यास्तव, मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक संवर्गाच्या तसेच केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-२ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करावा व त्यानुसार तात्काळ पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा लागणार आहे.

हे पण पहा ~  Old pension : मोठी बातमी...जुनी पेन्शन योजना लागू होणार! कर्मचारऱ्यांनी शासनाला द्यावा थोडा वेळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Government employees promotion

शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२२ नुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यामधूनच केंद्र प्रमुख पदी पदोन्नती बाबत निर्देश आहेत. त्यामुळे शासन निर्णय दिनांक ०१ / १२ / २०२२ व शासन शुद्धिपत्रक दि.०१/०३/२०२३ अन्वये नियमानुसार पदोन्नती विषयक कार्यवाही करण्यात येणार आहे.

 सरकारी कर्मचारी व केंद्र प्रमुख भरती पदोन्नती संदर्भात आजचे शासन परिपत्रक येथे पहा

कर्मचारी पदोन्नती

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d