Old pension strike : जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील 7 दिवसांपासून संप पुकारला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा तत्व लागू करण्यात संदर्भात अभ्यास समिती स्थापन केली आहे.परिणामी अंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
जुनी पेन्शन योजना आंदोलन मागे
21 मार्च रोजी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत असे समन्वय समितीकडून सांगण्यात आले होते. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले.
हे पण पहा – सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ
जुनी पेन्शन योजना लागू होईल का?
आज जुनी पेन्शन अभ्यास समितीची मुदत संपली आहे आता कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होईल का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समितीच्या अहवालात काय नमूद करण्यात आले आहे ? अहवालामधील शिफारशी आता राज्य शासन केव्हा लागू करणार? याबाबत देखील राज्य कर्मचाऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Old pension updates
राज्य शासना बरोबरच केंद्र सरकारने देखील जुन्या पेन्शन मध्ये बदला संदर्भात समिती नेमली आहे.यामुळे आता केंद्र शासनाच्या समिती आणि राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा प्राप्त झालेला अहवाल यांचा एकात्मिक अभ्यास करून शिंदे-फडणवीस सरकार जूनअखेरीस यावर योग्य तो आणि सकारात्मक निर्णय घेणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.