Bank Locker : बँकेच्या लॉकरमध्ये होणार मोठा बदल! ग्राहकांना मिळणार अनेक फायदे? पहा काय आहे नियम

plotBank Locker Rules : रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना त्यांच्या लॉकर ग्राहकांसोबत १ जानेवारी २०२३ पूर्वी त्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यास सांगितले आहे. हे सर्व आरबीआयच्या १ जानेवारी २०२२ पासून लागू झालेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे.

मौल्यवान वस्तू, दागदागिने, शेअर सर्टिफिकेट्स, घराची कागदपत्रे इत्यादी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण बँकेत लॉकर घेतो. या लॉकरसाठी नुतनीकरण करार १ जानेवारी २०२३पर्यंत करावा लागणार आहे.

कसे करावे लॉकर ॲग्रीमेंट? 

लॉकर ॲग्रीमेंटच्या माध्यमातून बँक आणि ग्राहक यांच्यात करार केला जातो. या करारावर बँक अधिकारी आणि ग्राहक अशा दोघांचीही स्वाक्षरी असते. कराराची एक प्रत ग्राहकांना दिली जाते. तर एक प्रत बँकेकडे असते. या करारात बँकेवर कोणती जबाबदारी असेल, याचा तपशील दिलेला असतो.

करार करताना ग्राहकांनी एका वर्षात आपल्या लॉकरचा कमीत-कमी एकदातरी उपयोग करावा, असे सांगितले जाते.दरम्यान, लॉकरमधील सामानाचे नुकसान झाल्यानंतर बँकेला ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागते. आग लागने, इमारत कोसळणे, लॉकरमध्ये ठेवलेली मौल्यवान वस्तू गहाळ होणे अशा घटना घडल्यास ही नुकसानभरपाई १०० असते

बँक बंद पडल्यास

– बँकेची लॉकर असलेली शाखा बंद झाल्यास, संपूर्ण बँक बंद झाल्यास, ही बँक दुसऱ्या एखाद्या बँकेत विलीन झाल्यास या स्थितीत बँकेला दोन वर्तमानपत्रांत आधी नोटीस देणे बंधनकारक राहील

  • बँकेने लॉकरधारकांना किमान दोन महिने आधी वैयक्तिक निरोप धाडणेही बंधनकारक राहील
  • बँकेला अचानक जागा बदलावी लागल्यास त्याची पूर्वसूचना लॉकरधारकांना देणे आवश्यक असेल
हे पण पहा ~  Save money tricks : खिशात पैसे टिकत नाहीत? पहा उपाय आणि अशी करा पैशाची बचत

बँक लॉकर नियम

  • हे नियम १ जानेवारी २०२२ रोजी अस्तित्वात आले
  • हे नियम १८ ऑगस्ट २०२१रोजी तयार करण्यात आले होते
  • यानुसार सध्या लॉकर असणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या लॉकर कराराचे नुतनीकरण १ जानेवारी २०२३पर्यंत करून घेणे बंधनकारक आहे
  • नव्या नियमांनुसार आता ग्राहक फक्त दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि कायदेशीररित्या मान्य असलेल्या गोष्टीच ठेऊ शकतात.
  • बँकेचे लॉकर आता वैयक्तिक होणार असून, नॉन ट्रांसफरेबल करण्यात येणार आहेत. म्हणजेच आता कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आपले लॉकर वापरू शकत नाही.
  • बँकेच्या लॉकरमध्ये शस्त्रे, रोख रक्कम किंवा परकीय चलान, औषधे, निषिध्द किंवा विषारी वस्तू ठेवता येणार नाही.

लॉकर करारातील महत्त्वाचे मुद्दे येथे पहा 

लॉकर करार

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d