State employees transfer : शासन सेवेतील गट-अ, गट-ब व गट-क मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना,बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करणेबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र विभागाने नवीन शासन निर्णय दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी निर्गमित केला आहे.
सरकारी अधिकारी कर्मचारी पदस्थापना बदली नियम
शासन निर्णयान्वये गट-अ, गट-ब व गट-क मधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळे स्थापन करण्यात आली आहेत.आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
Employees news Maharashtra
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील उच्च शिक्षण संचालनालय,तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय, ग्रंथालय संचालनालय व व्यवसाय शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधिनस्त विभागीय सहसंचालक कार्यालये,शासकीय महाविद्यालये व शासकीय संस्था यातील गट-अ, गट-ब व गट-क मधील अधिकाऱ्यांच्या/ कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना व बदली करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारस करण्यासाठी नागरी सेवा मंडळे स्थापन करण्यात आली आहे.
अधिकारी कर्मचारी बदली प्रक्रिया
गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या पदस्थापना,बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी खालील पध्दत असणार आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार बदल्यांच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे बंधनकारक राहील.
कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना,बदली, शिफारस मंडळ व नवीन शासन निर्णय येथे पहा