ops committee : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारला होता.जुनी पेन्शन मागणीसाठी राज्यातील तीन प्रमुख संघटना राजपत्रित अधिकारी महासंघ,राज्य मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांची पहिली बैठक 21 एप्रिल रोजी पार पडली होती.जुनी पेन्शन मागणी साठी प्रस्ताव संदर्भात नवीन अपडेट्स समोर आली आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
राज्य सरकारने स्थापन केलेल्या जुनी पेन्शन अभ्यास समितीसमोर सर्व आस्थापनेतील संघटनेला संमत होईल असा प्रस्ताव समितीस सादर करायचा आहे.दिनांक 09 मे 2023 रोजी जुनी पेन्शन अभ्यास समितीस अहवाल सादर करण्यात येणार आहे.
सदरील बैठकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी विविध संघटनांची तातडीची बैठक गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता ठाकरसी हाऊस,तिसरा मजला जे.एन हेरेडीया मार्ग बेलाई इस्टेट मुंबई येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Old pension committee updates
ओपीएस आणि एनपीएस यांचा तुलनात्मक अभ्यास विश्लेषण,आकडेवारीसह प्रस्तावाच्या प्रती तयार करुन बैठकीसाठी येण्याचे आवाहन सरकारी,निमसरकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केले आहे.
दिनांक 21 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत जुन्या पेन्शनसाठी गठित अभ्यास समितीसमोर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.वितेश खांडेकर व राज्य सल्लागार श्री.सुनिल दुधे यांनी भूमिका मांडूण प्रस्ताव सादर केला होता.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम भत्ता संदर्भात नवीन अपडेट्स येथे पहा