Ashadhi Ekadasi : काय आहे आषाढी एकादशीचा इतिहास,महत्त्व ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आषाढी एकादशी 2022 : सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) च्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

आषाढी एकादशी महत्त्व

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला  पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो.

चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो.

ही एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

पंढरपूर वारी

पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.

आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची पंरपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते.

देवशयनी एकादशी २०२२ मुहूर्त

आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र, कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते. कार्तिक महिन्यात देवकार्ये सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते.

देवशयनी एकादशी २०२२ मुहूर्त  – देवशयनी एकादशी प्रारंभः ०९ जुलै २०२२ रोजी दुपारी ०४ वाजून ३९ मिनिटे

देवशयनी एकादशी समाप्तीः १० जुलै २०२२ रोजी दुपारी ०२ वाजून १३ मिनिटे

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी रविवार १० जुलै २०२२ रोजी साजरी करण्यात येईल.

Ashadhi Ekadashi Diet Tips

एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी. आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा या ४ गोष्टी.

काकडी, रसदार फळे यांचाही आहारात समावेश वाढवायला हवा. म्हणजे उपवासाचा त्रास न होता उपवासाचा दिवस सगळ्या अर्थाने चांगला होईल.

एकादशी दुप्पट खाशी असे न करता योग्य तेच खाल्ले तर उपवास आरोग्यदायी होईल.आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी.महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तीभावाने उपवास करतात. प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही. पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो.

एकादशी दुप्पट खाशी असं आपल्याकडे उपहासाने म्हटले जाते. मात्र तसे न करता तब्येतीला झेपेल असा आहार घ्यायला हवा. आता उपवास म्हटल्यावर रोजच्यापेक्षा आहारात थोडे बदल केले जातात. पण ऐन पावसाळ्यात आषाढीचा उपवास करताना आहाराबाबत काळजी घ्यायला हवी पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच वात किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने पुरेशी काळजी घ्यायला हवी. उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण पडला तर तब्येत खराब होण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे एकादशीचा उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी (Ashadhi Ekadashi Diet Tips)

>> पावसाळ्याच्या दिवसांत आपल्याला साधारणपणे गरम काहीतरी प्यावेसे वाटते. अशावेळी सतत चहा-कॉफी न घेता गरम दूध, आमसूलाचे सार, दाण्याची आमटी, ताकाची कढी असं काही घेता आलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल. एखाद दुसरा कप चहा-कॉफी ठिक आहे पण सतत चहा कॉफी प्यायल्याने ॲसिडीटी व्हायची शक्यता जास्त असते.

>> उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करु नये. अनेक जण निर्जल किंवा काहीही न खाता पिता उपवास करतात. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच उपवास करायला हवा. ज्यांना डायबिटीस, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीचा योग्य पद्धतीने विचार करुन मगच उपवास करावा. तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टाहास नको.

हे पण पहा ~  Mahashivaratri 2023: पहा महाशिवरात्र शुभ मुहूर्त, साहित्य,पुजा विधी आणि महत्व

>> उपवास म्हणजे साधारणपणे साबुदाणा, बटाटा, दाणे असे वातूळ पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. पण पावसाळ्याच्या दिवसांत आधीच पचनशक्ती क्षीण झालेली असते. त्यात गॅसेसचा त्रास होत असेल तर वातूळ पदार्थांचे प्रमाण कमी राहील असे पाहावे.

>> उपवासाला अनेकदा तळलेले वडे, चिवडा, पापड्या, वेफर्स असेही खाल्ले जाते. पण गारठ्यामुळे आपल्याला खोकला झाला असेल तर असे तळकट पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो या गोष्टी घरात तळून खाव्यात कारण बाहेर कशाप्रकारचे तूप, तेल वापरतात आपल्याला माहित नसते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे न खाल्लेलेच जास्त चांगले. त्यापेक्षा खजूर, राजगिऱ्याचे लाडू, सुकामेवा हे खायला हवे. याबरोबरच काकडी, रसदार फळे यांचाही आहारात समावेश वाढवायला हवा. म्हणजे उपवासाचा त्रास न होता उपवासाचा दिवस सगळ्या अर्थाने चांगला होईल.

आषाढी एकादशी इतिहास

आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समज आहेत. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो.

महाराष्ट्रातील पंढरपूर आणि काशीविश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्र आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असं मानलं जांत. त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्त्व असून दरवर्षी आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात. ही पंरपरा 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येतं.

पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. 516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. 1296 मध्ये चालू झाली; तर इ.स. 1650 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली.

चंद्रभागेच्या वाळवंटा (नदीकाठच्या छोटय़ाशा वाळूचे मैदान) पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद ङ्खरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला ‘नामदेव पायरी’ म्हणतात. कोपर्‍यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो.

पौराणिक कथा 

भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्री च्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले.

त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.

वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे “आषाढी एकादशी”  या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये (Pandharpur) विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीला  देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. यावर्षी 10 जुलै 2022 रोजी (रविवारी) आषाढी एकादशी येत आहे. राज्यात आध्यात्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व  आहे.

हे पण पहा असे करा डाऊनलोड आपले मतदान कार्ड 

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment