Police Bharati 2023 : सात हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Police Bharati :  राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्यातील गृह विभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022

गृह विभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार असून ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.यासंबंधीची जहिरात देखील काढण्यास सुरवात झाली आहे गडचिरोली जिल्हा पोलीस भरती साठी गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाने पोलीस कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग भरती 2022 अंतर्गत 136 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज सबमिट करू शकतात.गडचिरोली पोलीस भरती 2022 साठी जाहिरात निघाली असून त्यासाठी 21/5/2022 ते 06/05/2022 पर्यंत अर्ज उपलब्ध होणार आहेत.

7 हजार पोलीस शिपाई पदे भरणार 

पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रिया पुर्ण झाल्यावर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.कोरोना काळात राज्यातली पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती.गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती पार पडली नव्हती.

हे पण पहा ~  Employees Transfer : राज्यात सरकारी कर्माऱ्यांच्या बदल्यांचा 'हा' नवीन पॅटर्न लागू? कर्मचारी संभ्रमात

महाराष्ट्रातील लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत असतात.अनेक वर्षापासून पासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. सरकारने कोरोना सरल्यानंतर उशिरा का होईना पण 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

5200 पदांची भरती प्रक्रिया सुरू

राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमधील 2019 च्या भरती प्रक्रियेनुसार 5200 पदांची भरती होणार होती.ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे and दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022 जाहिरात पाहण्यासाठी खाली क्लिक करा

      गडचिरोली पोलीस भरती जाहिरात

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

3 thoughts on “Police Bharati 2023 : सात हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू”

Leave a Comment