EEmployees transfer : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना आता आणखी पारदर्शक स्वरूप प्राप्त होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे तर बघूया सविस्तर शासन निर्णय
सरकारी कर्मचारी बदली शासन निर्णय
मा.सर्वोच्च न्यायालय यांनी रिट पिटीशन (सिव्हील) क्र.८२/२०११ मध्ये दिनांक ३१.१०.२०१३ रोजी दिलेल्या न्याय निर्णयामुळे शासन सेवेतील गट-अ, गट-ब व गट-क मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना व बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारसी करण्यासंदर्भात शासन निर्णय दिला आहे.
शासन निर्णयामुळे आता मा.मंत्री,सार्वजनिक आरोग्य यांना प्रदान करण्यात आलेले सर्वसाधारण बदल्यांचे अधिकार (सामान्य राज्यसेवा गट-ब व वैद्यकीय अधिकारी गट-ब) आयुक्त,आरोग्य सेवा मुंबई यांना प्रत्यार्पित करण्यात आलेले आहेत.
Employees transfer news
सामान्य राज्यसेवा गट-ब आणि वैद्यकीय अधिकारी गट ब (वेतनस्तर एस-१६) या संवर्गातील अधिका-यांच्या बदलीबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारस करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात आले आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५२२१७५४२३८९१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
बापरे.. या सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद!