7th payEmployees news : DA आणि DR मध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत, पहा संपूर्ण माहिती, DA वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारला जातो, जेणेकरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईच्या दबावाला तोंड देता येईल.
सातवा वेतन आयोग महागाई भत्ता
महागाई भत्ता,ज्याची गणना मूळ वेतनाची टक्केवारी म्हणून केली जाते, महागाई आणि राहणीमानाच्या खर्चातील बदल लक्षात घेऊन वेळोवेळी सुधारित केले जाते. सध्याचा डीए 42 टक्के आहे आणि नवीन घोषणेमुळे त्यात आणखी 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदा डीए वाढवण्यात आला होता, त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
ग्राहक किंमत निर्देशांकात (AICPI) वाढ
AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे ठरविले जाते.प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जाहीर केली जाते.
भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात जुलै महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे.ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंकांवर होता.सप्टेंबरमध्ये तो 131.3 अंकांवर होता.ऑक्टोबरमध्येही AICPI निर्देशांकाचा आकडा 132.5 होता.ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या आकडेवारीत कोणताही बदल झालेला नाही.AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 लक्ष कर्मचार्यांसाठी DA वाढीचा (महागाई भत्ता) मार्ग मोकळा झाला आहे.
आठवा वेतन आयोग लवकरच !
आगामी निवडणुका लक्षात घेता सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.सध्या कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या आधारे फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे.त्याचवेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळवेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढले आहे.
कर्मचारी थकित वेतन आयोग हप्ता फरक शासन निर्णय आला