7th pay arrears : सन २०२१-२२ व २०२२-२३ मधील दोन वर्षी अनुज्ञेय झालेले हप्ते व सन २०२३-२४ चा हप्ता एकत्रितपणे दिनांक १ जुलै, २०२३ रोजी संबंधित कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्यात येणार आहे.
NPS / DCPS योजना धारक कर्मचाऱ्यांबाबत
नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसल्याने अशा कर्मचाऱ्यांना दि.१.१.२०१६ ते दि.३१.१०.२०२० या कालावधीतील थकबाकी वित्तीय वर्ष २०२१-२२ पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात पुढे नमूद केल्याप्रमाणे रोखीने अदा करण्यात येणार आहे.
दि.१.१.२०१६ ते दि.३१.१०.२०२० पर्यंतच्या कालावधीसाठी ज्या कर्मचाऱ्याने निवृत्तीवेतन खात्यामध्ये अगोदरच (असुधारित वेतनानुसार) दिलेली नियमित वर्गणी, सुधारित वेतनसंरचनेत निश्चित केलेले वेतन विचारात घेता नियमांनुसार विहित केलेल्या किमान वर्गणीपेक्षा कमी पडत असेल, तर ती थकबाकीच्या रकमेतून वसुल करून त्यावरील शासनाच्या उचित अंशदानासह अशी रक्कम स्तर 1 खात्यामध्ये जमा करावी लागणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग फरक
दि. ०१.०१.२०१६ ते दि.३१.१०.२०२० या कालावधीत सेवानिवृत्त अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त झाल्या असतील, अशा कर्मचाऱ्यांना दि.१.०१.२०१६ पासून ते सेवेत असलेल्या दिनांकापर्यंतच्या कालावधीची वेतनाची थकबाकी अनुज्ञेय असल्यास, सदर थकबाकी वरील खंड (अ) व (ब) मध्ये नमूद केलेल्या रकमा वजा / समायोजित करून पाच समान हप्त्यांत पाच वर्षात रोखीने अदा करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4% वाढ! पहा डीए वाढ व फरक
मयत कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग फरक
दि.०१.०१.२०१६ ते दि.३१.१०.२०२० या कालावधीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीतील वेतनाच्या थकबाकीची रक्कम अनुज्ञेय असल्यास कर्मचाऱ्याच्या बाबतीत अदा करावयाच्या बाकी असलेल्या हप्त्याची / हप्त्यांची रक्कमही त्याच्या अवलंबितांना वरील खंड (अ) आणि (ब) मध्ये नमूद केलेल्या रकमा वजा / समायोजित करून एकाच हप्त्यात रोखीने अदा करण्यात येणार आहे.
सातवा वेतन आयोग थकबाकी फरक शासन निर्णय येथे पहा
1/1/2016 नंतर सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचार्यांचा सेवेत असे पर्यंत चे एकूण महागाई भत्ता ची वाढीव रक्कम पाच समान हप्त्यात दिले जाणार हे सर्व श्रुत आहे.
वाढीव रक्कम ेचा पहिला,दुसरा मिळाला व तिसरा हप्ता जून 2022 मध्ये मिळाला असताना,आता चवथा व पाचवा हप्त्याची रक्कम कधी मिळणारे?
1 जुलै ल पेन्शन हप्ता मिळणार का दरवर्षी प्रमाणे