Retirement age : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्षाच्या अतिरिक्त सेवा;सेवानिवृत्तीचे वय होणार 60 वर्षे!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Retirement age : भारतात सध्या कमाल निवृत्तीचे वय 58 ते 65 वर्षे आहे.ही तफावत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांपासून ते सरकारी क्षेत्रापर्यंत आहे.आपण युरोपियन युनियनबद्दल बोलायचे झाले तर तेथे निवृत्तीचे सरासरी वय 65 वर्षे आहे.युरोपमध्ये डेन्मार्क,इटली आणि ग्रीसमध्ये निवृत्तीचे वय 67 वर्षे आहे आणि अमेरिकेत 66 वर्षे आहे.

Government Employee’s Retirement Age

राज्य सरकारचे एकूण 17 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यातील 3% कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होत असतात.राज्य सरकारी सेवेत पात्र होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 31 ते 43 वर्षे इतकी आहे.त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सेवेचा कार्यकाल अल्प मिळतो.

सरकारला त्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येत नाही. आयएएस,आयपीएस आणि राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय (Government Employee’s Retirement Age) यापूर्वीच 60 करण्यात आले आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतीचे वय केंद्र सरकार व भारतीय प्रशासनिक सेवांप्रमाणे 60 वर्षे करण्याबाबात राज्य कर्मचारी संघटनांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे.परिणामी सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत अभ्यासासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्ती सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली सहासदस्यीय समिती नियुक्त केली होती.

हे पण पहा ~  Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून माहे फेब्रुवारी मध्ये कपात होणार 'एवढा' निधी

Government employees updates

केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे.राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून साठ वर्ष करण्यात यावे अशी मागणी राज्यातील विविध कर्मचारी संघटना कडून राज्य शासनाला वेळोवेळी निवेदने दिलेले आहेत.

सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp Group

राज्याच्या सामान प्रशासन विभागाकडून प्रस्ताव देखील तयार करण्यात आलेला होता,पण या प्रस्तावाला राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी विरोध केल्याने सदर प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबितच आहे.

Retirement age news

शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवली जात आहेत.राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे (Retirement age) वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असल्याने राज्य शासनाकडून या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

आता ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार बालसंगोपन रजा

सरकारी कर्मचारी अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “Retirement age : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्षाच्या अतिरिक्त सेवा;सेवानिवृत्तीचे वय होणार 60 वर्षे!”

Leave a Comment