Maternity leave : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार 9 महिने रजा..

Maternity leave : महिलांच्या हिताचे निर्णय घेऊन महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न भाजपच्या मोदी सरकारकडू होत आहे.देशभरातील सरकारी कर्मचारी नोकरदार महिलांना 9 महिने बालसंगोपन रजा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बालसंगोपन रजा वाढणार?

निती आयोगाचे सदस्य डॉ. वी. के पॉल यांचे विधान समोर आले आहे.सरकारी आणि खासगी संस्थांमधील महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचा कालावधी 6 महिन्यांऐवजी आता 9 महिने करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे समोर आले आहे.

संसदेत 2016-2017 मध्ये मातृत्व लाभ संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले होते.ज्यामुळे यापूर्वी मिळणाऱ्या 3 महिन्यांच्या बालसंगोपन रजा वाढवून 6 महिन्यांपर्यंत करण्यात आले आहे.

Employees maternity leave updates

भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (FICCI) च्या महिला संघटनेने (FLO) एक विधान जारी केले आहे. त्यामध्ये, डॉ. पॉल यांचा हवाला देण्यात आला असून खाजगी आणि सरकारी क्षेत्रांमधील महिलांच्या मातृत्त्व काळातील रजा 6 महिन्यांऐवजी वाढ करुन 9 महिने करण्यावर विचार करावा असे समोर आले आहे.

हे पण पहा ~  Employees leave : खुशखबर... 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना 10 मे रोजी फुल पगारी सुट्टी! शासन निर्णय दि. 2/5/2023

महागाई भत्ता 42% ! मग 5 महिन्याचा फरख किती मिळणार पहा 2 मिनिटात

DA hike calculator

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment