Teachers transfer : महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला असून यापुढे शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदलांसंदर्भात नवीन बदली धोरण ठरवण्यात आलेले आहे.
शिक्षण सेवकांच्या नियुक्तीचा आणि त्यानंतर नियमित करण्याच्या पद्धती सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे तर या सर्व बदली धोरणाचा सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये सारांश रूपात बघणार आहोत
शिक्षक बदली शासन निर्णय 2023
1) आंतर जिल्हा बदली – आंतर जिल्हा बदली पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सन 2022 मध्ये ऑनलाईन अर्ज भरलेल्या शिक्षकांची प्रतिक्षा यादी लागणार आहे.
2) जिल्हा अंतर्गत बदली – सध्या कार्यरत शिक्षकांचे एक संधी देऊन रिक्त जागेवर समुपदेशन होणार आहे.जिल्हा अंतर्गत बदली करताना आपसी बदली, वैद्यकीय बदली पती – पत्नी एकत्रीकरण नवीन धोरण ठरविण्यात येईल.
3) नवीन भरती – आधार प्रमाणित संच मान्यता करून पवित्र पोर्टल द्वारे भरतीने 80 % रिक्त पदे भरण्यात येईल.
4) पवित्र पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर पती पत्नी, विधवा अपंग इ विचार केला जाईल.शेवटी पवित्र पोर्टल मधील गुणांच्या आधारे पद स्थापना देण्यात येईल.
5) नवीन शिक्षक भरती झाल्यावर जिल्हा बदली अधिकार राहणार नाही.
6) शिक्षण सेवक कालावधी पुर्ण झाल्यावर मुल्यांकन होणार
7) शाळेत धुम्रपान व तंबाखू सेवन केल्यास सिईओ मार्फत कार्यवाही करण्यात येईल.
शिक्षक बदली शासन निर्णय येथे डाऊनलोड करा