Employees appointmentRetired employees : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
Retired employees appointments
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिक्षकांची 1 हजार 752 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील 161 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत.शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.परिणामी रत्नागिरी जिल्हा परिषदेने मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.आता या रिक्त जागांवर नियुक्ती करण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना प्रति महिना 20 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
कंत्राटी शिक्षक नियुक्ती पध्दत
- सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक करताना संबधित गावातील कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करा.
- संबंधित गावात सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास 7 किमी परिसरातील निवृत्त शिक्षकाचा विचार करण्यात यावा.
- जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात येईल.
- संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे.
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर निवृत्त शिक्षकांचे बंधपत्र करार संपुष्टात येईल.
- प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाचे वय 70 पेक्षा जास्त नसावे.
- नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे दिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर राहणार आहे.
- मानधन पध्दतीने बंधपत्र / हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाकडून जाहीर अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
- मानधन करार पध्दतीने नियुक्त केलेल्या शिक्षकांना नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती वय संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय येथे डाऊनलोड करा