State employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका तयार! शासन निर्णय दि.15/6/2023

State employees : महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका सन १९६३ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाली असून ती सन १९९४ मध्ये मराठीत पुनर्मुद्रित करण्यात आली.बदलत्या काळात कार्यालयीन कामकाज पध्दतीत झालेले बदल विचारात घेऊन महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका, २०२३ सुधारित आवृत्ती (इंग्रजी) दि.१/६/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कार्यालयीन कार्यपद्धती शासन निर्णय

शासकीय कामकाज सुव्यवस्थितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने विभागांतील अधिकारी/ कर्मचाऱ्यांमध्ये अधिकार / जबाबदारी विहीत करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुख्य सचिव / अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सह / उपसचिव, अवर सचिव, कार्यासन अधिकारी, मा. मंत्री / मा. राज्यमंत्री यांचे स्वीय कर्मचारी, वरिष्ठ स्वीय सहायक / स्वीय सहायक / लघुलेखक, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक, बहु- कार्य कर्मचारी (Multi Tasking Staff) यांच्या अधिकारांची/ कामांची विभागणी करण्यात आली आहे.

State employees new rules

शिपाई, दफ्तरी, जमादार, परिचालक (Operator), चौकीदार, सफाईवाला इ. गट “ड” च्या कर्मचाऱ्यांना Multi Tasking Staff (MTS) असे संबोधण्यात आले आहे.

हे पण पहा ~  Bakshi samiti khand 2 अहवालामध्ये मोठा घोळ! ठराविक संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी ! इतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय

सरकारी कर्मचारी कर्मचारी कार्यपद्धती शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

शासन निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज हाताळण्याबाबत तसेच डिजिटल व ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाज पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन मार्गदर्शक सूचना अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

मंत्रालयीन,प्रशासकीय विभाग तसेच इतर क्षेत्रिय कार्यालयांमध्ये फाईल / नस्ती निर्णयार्थ सादर करण्यासंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात य येणार आहे.

सरकारी कर्मचारी कार्यपद्धती नवीन नियम येथे पहा

कर्मचारी कार्यपद्धती

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d