Breaking news : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू! शासन निर्णय निर्गमित दि. 7/7/2023 || New pay commission

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New pay commission : महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. नवी मुंबई यांच्या संचालक मंडळ यांच्या दि.३० सप्टेंबर २०२१ रोजीच्या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातील नियमीत सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबत ठराव पारीत करण्यात आला होता.

सातवा वेतन आयोग लागू होणार

सदर ठरावानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातील नियमीत सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर दि.०१ जुलै २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे.

वित्त विभागाच्या दिनांक ०४ ऑगस्ट, २०२१ च्या शासन निर्णयातील निकषास अनुसरून महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. येथील नियमीत सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मधील रकाना क्र. ७ प्रमाणे सुधारित वेतन श्रेणी दिनांक ०१ जुलै, २०२१ पासून लागू करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

7th pay commission updates

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळात नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचान्यांना दि.०१.०७.२०२१ पासून ७ वा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू केल्यास येणारा आर्थिक भार महामंडळाने स्वबळावर भागवावा लागणार आहे.याकरीता शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद आता वा भविष्यात उपलब्ध करुन दिली जाणार नाही. 

सरकारी कर्मचारी महागाई भत्ता, वेतन आयोग, शासन निर्णय, सरकारी योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा

हे पण पहा ~  Dearness allowance : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... महागाई भत्ता वाढ संदर्भात आली महत्त्वाची अपडेट्स!

Join WhatsApp Group

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने वित्त विभाग/ शासनाकडून ७ व्या वेतन आयोगासंदर्भात निर्गमित करण्यात आलेले दि. ३० जानेवारी २०१९, दि. २० फेब्रुवारी, २०१९, दि.०४ ऑगस्ट, २०२१ व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या शासन निर्णय / परिपत्रकातील अटी व शर्तीचा मार्गदर्शक तत्वे म्हणून अवलंब करावा व त्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी करण्यात येईल.

सुधारित वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करण्यात येणार

सन २०१९-२० पासून महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळास नफा होत असला तरी संचित तोटा निरसित होणे आवश्यक आहे. यास्तव दि. ०१ जुलै २०२१ पासून सुधारित वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करण्यात येणार आहे. 

दि.०१ जुलै, २०२१ ते सुधारीत वेतनश्रेणीची अंमलबजावणी करेपर्यंतच्या कालावधीतील थकबाकी (एकरकमी अथवा टप्याटप्याने) अदा करण्याबाबत संचालक मंडळाच्या मान्यतेने विभागास प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ‘या’ भत्त्यांचा सामावेश

वेतनवाढ व भत्ते

शासनामधील समकक्ष पदांना लागू करण्यात आलेल्या वेतनश्रेणी महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांना लागू करताना मिळणारा लाभ जास्त असू नये. सुधारीत वेतन श्रेण्या त्या मर्यादेत लागू असाव्यात.

महामंडळाचे स्वरूप हे सामाजिक नि प्रवर्तक स्वरूपाचे असले तरी महामंडळ सन २०१९-२० पासून नफ्यात आलेले आहे. सवन यापुढेही महामंडळ सातत्याने नफ्यात राहील याबाबत व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ यांनी दक्षता घ्यावी व याबाबतचा अहवाल वित्त विभागास सादर करावा.

नवीन वेतन आयोग अंतर्गत पद संवर्ग व वेतनस्तर येथे पहा

सुधारित वेतनश्रेणी

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment