Salary : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा घटक म्हणजे पगार होय. दर महिन्याला मिळणाऱ्या या पगारा संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती असणे आवश्यक असते.तर बघूया या पगार पत्रकासंबंधात सविस्तर माहिती
Employees salary slips
आपल्या पगार पत्रकामध्ये आपल्याला मिळणारे मुळवेतन, महागाई भत्ता,घरभाडे भत्ता,प्रवास सामावेश पहायला मिळतो. तर दरमहा होणारी कपात यामध्ये व्यवसाय कर, गटविमा ,एलआयसी इ घटकांच्या समावेश असतो.
आपल्याला मिळणारा पगार आणि होणारी कपात याचा ताळेबंद केल्यानंतर आपल्याला जो पगार आपल्या खात्यात जमा होतो तो असतो ते आपले निव्वळ वेतन असते.
मूळ वेतन (Basic pay)
मूळ वेतन म्हणजे कर्मचाऱ्याला सद्यस्थितीमध्ये निश्चित केलेली वेतनश्रेणी मधून मिळणारे वेतन होय. S-1 ,S-2, S-3,पासून श्रेणी निश्चित केलेल्या असून त्यानुसार आपले वेतन आणि पुढील भत्ते अवलंबून असतात.
महागाई भत्ता (Dearness allowance)
महागाई भत्ता म्हणजे डियरनेस अलोन हे आपल्याला माहिती असेल हा डीए आपल्याला आपल्या मूळ वेतनावर मिळत असतो म्हणजे आपली जी बेसिक किंवा स्केल आहे समजा माझा बेसिक 41 हजार 100 आहे तर तर मला सद्यस्थितीमध्ये 42 % दराने या मूळ वेतनावरती महागाई भत्ता 17,262 रुपये मिळेल.
पगार खात्याचे महत्त्व व कोणती बॅंक देते सर्वाधिक फायदे येथे पहा
घरभाडे भत्ता (House Rent Allowance)
घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए हा सुद्धा आपल्या मूळ व्यक्तिनावर आधारित असून साधारणपणे पाच लाख लोकसंख्या पेक्षा कमी क्षेत्रात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ टक्के दराने हा एचआर मिळत असतो तर माझा पगार मूळ वेतन 41 हजार 100 रुपये आहे तर मला 8% टक्के दराने साधारणपणे 3288 रुपये एवढा घरभाडे भत्ता मिळेल.
प्रवास भत्ता (Travels Allowance)
साधारणपणे यामध्ये आपल्याला आपल्या वेतनात मिळणाऱ्या प्रवास भाड्याचा समावेश असतो आपल्याला 25% महागाई भत्ता झाल्यानंतर 1350 रुपये प्रवास भाडे किंवा TA मिळत आहे.
“थोडक्यात मूळ वेतन, महागाई भत्ता,घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अपंग भत्ता, धुलाई भत्ता आणि इतर जे भत्ते असतात त्यांना एकत्रित करून जे वेतन तयार होते ती आपले एकूण वेतन असते.”
आपल्या वेतनातून दरमहा होणारी कपात येथे पहा