Old pension : नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना “जुनी पेन्शन योजना” लागू करा’ या मागणीसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक 14 मार्च 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जातील असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
राज्यात काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार आहेत.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्यातील इतर सरकारी व निमसरकारी कर्मचारी संपामध्ये सामील होणार आहेत.
मध्यवर्ती संघटना समन्वय समितीचे नेतृत्व करीत असल्यामुळे, समन्वय समितीच्या वतीने सर्वांना जुनी पेन्शन लागू करा ही प्राथम्याची मागणी व इतर प्रलंबित मागण्यांचा सांप्रत राज्य शासनाने लगेच निर्णय घ्यावा या आग्रहासाठी, नाईलाजाने, राज्यभरातील सर्व कर्मचारी शिक्षक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जातील अशी घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक श्री. विश्वास काटकर यांनी केली.
राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी युनियन,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना,राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेस संलग्न संघटना अशा विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या तब्बल 60 कर्मचारी संघटना आपल्या हक्कासाठी एकत्र येवून पुढील महिन्यामध्ये बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बक्षी समिती अहवाल खंड 2 प्रकाशित पहा शासन निर्णय
Achchha hai.