ITR File : करदात्यांसाठी मोठी बातमी….आयटीआर फाईल करण्यासाठी आता Form 16 ची गरज नाही

ITR Return : इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेल्या असून आता आयटीआर भरण्यासाठी 16 नंबरचा फॉर्म भरलेला नसला तरी सुद्धा आपल्याला आता आयटीआय भरता येणार आहे बघूया सविस्तर माहिती

विना Form 16 दाखल करा ITR

आयकर भरण्यासाठी Form 16 कंपनीने दिला नसेल तर, विना फॉर्म 16 पण ITR दाखल करता येईल. सरकारी व खाजगी कर्मचाऱ्याला पगार पत्रक, बँकेचा तपशील, व्याज प्रमाणपत्र, किरायाचे कागदपत्र अशी कागदपत्रे दाखल करुन आय.टी.आर दाखल करता येईल.सदरील कागदपत्रांआधारे तुम्हाला एकूण किती महसूल मिळाला याचा तपशील दाखवता येणार आहे.

इन्कम टॅक्स पोर्टलचा वापर करा

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यसााठी आयकर विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करता.ऑनलाईन टॅक्स फायलिंग पोर्टलाचा वापर करता येईल. ग्राहकांच्या अनुकूल इंटरफेस फॉर्म भरण्याची प्रक्रिया असल्याने ऑनलाईन आयटीआर भरताना अडचणी येणार नाहीत.

आयटीआर अंतिम मुदत

प्राप्तिकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करुन घेऊ शकता.एकूण उत्पन्न, एकूण बचत आणि टीडीएसची माहिती भरायची आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो स्कॅन करून आयकर पोर्टलवर अपलोड किंवा ई व्हेरिफिकेशन करावे लागेल,जेव्हा तुम्ही त्याची पडताळणी कराल तेव्हाच ITR फॉर्म भरलेला मानला जाईल.आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

हे पण पहा ~  ITR Rebate : आयकर भरताना घरभाडे सुट घेत असाल तर सावधान! घ्या ही काळजी

कोणासाठी कोणता फॉर्म

आयटीआर फॉर्म 1 हा नोकरदार,ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे. तर आयटीआर फॉर्म 4 हा कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, त्यांच्यासाठी हा अर्ज आहे.

महत्वपूर्ण कागदपत्रे

  • पगार स्लिप, बँकचे विवरण
    गुंतवणुकीसंबंधीचे दस्तावेज
    आयटीआरच्या अर्जाची एक प्रत

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d