ITR filling : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन Section 115BAC नुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या आयकर परिगणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत.
आयकर कपात 2023- 2024
यानुसार योग्य पर्याय निवडून लेखी स्वरुपात या कार्यासनास आपले नाव PAN No. सह दि. 12 जून, 2023 पूर्वी कळविण्यात संदर्भात सुचना प्राप्त झाल्या आहेत.
कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या Tax Regime नुसार देय होणारी TDS बजाती करता येणार आहे.
तसेच जे अधिकारी / कर्मचारी Old Regime हा पर्याय स्विकारतील त्यांनी त्यांच्या संभाव्य 80C 80D. 80CCD व 80G गुंतवणूकीची माहिती सदर पर्यायासोबत आवश्यक कागदपत्रांसह दि. 12 जून, 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
Income tax new updates
जे अधिकारी / कर्मचारी Regime निवडीचा पर्याय विहित दिनांकापर्यंत सादर करणार नाहीत त्यांची default New Tax Regime प्रमाणे आयकर परिगणना करुन TDS कपात केली जाणार आहे.
आयकर कपात निवड संदर्भात मार्गदर्शक शासन परिपत्रक येथे पहा