Employees insurance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने दिनांक 4 फेब्रुवारी 2016 रोजी गट विमा योजना लागू केली होती. आता या योजनेत सुधारणा करून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या विमा रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भात शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला होता. राज्य सरकारने सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास दि.18/02/2017 च्या शासन निर्णयान्ये मान्यता देण्यात आली.
वैयक्तिक समुह अपघात विमा योजना
वैयक्तिक अपघात समुह विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये भारतीय वन सेवा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
सदरील अपघात गट विमा योजनेखाली गट-अ ते ड मधील अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता 300 रुपये इतक्या अत्यल्प वर्गणीमध्ये रुपये 10 लाख ही समान राशीभूत विमा रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
Gov Employees Group insurance
दि.01 एप्रिल 2023 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली असून सदर वर्गणी व राशीभूत रक्कम गटनिहाय निर्धारित करण्यात आली आहे.
माहे फेब्रुवारी 2023 महिन्याच्या वेतनाची देयके सादर झाल्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी तसेच,ज्या कर्माचाऱ्यांची वर्गणी माहे फेब्रुवारी 2023 महिन्यामध्ये वसूल करण्यात आलेली नाही,अशा कर्मचाऱ्यांना अपघात योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
गट विमा योजने अंतर्गत 2023 किती व्याज व रक्कम मिळाले येथे पहा