Employees Service book : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक होणार ऑनलाईन ! शासन निर्णय निर्गमित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Employees Service book : राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक संदर्भात e-HRMS म्हणजेच Human Resource Management System प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.आता सर्व सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येणार आहे.

Employees Digital service book

कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अध्ययावत करण्यासाठी e-HRMS प्रणाली https://115.124. 119,298 या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्य कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती E – HRMS प्रणालीवर भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. E – HRMS प्रणालीबाबत NIC मार्फत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात येणार आहे.

सर्व सरकारी विभागांत तसेच त्यांच्या अधीनस्त क्षेत्रीय कार्यालयांत सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक e-HRMS प्रणालीमध्ये भरण्याची प्रक संथ गतीने सुरू आहे. परिणामी सर्व मंत्रालयीन विभागांना तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहे.

हे पण पहा ~  Income Tax slabs : काय सांगता.. 'या' राज्य कर्मचाऱ्यांना इनकम टॅक्स माफ! कारण तरी काय?

ऑनलाईन सेवा पुस्तक प्रणाली

महाराष्ट्र राज्य सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात आले आहे की,नव्याने नियुक्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची सर्विस बुक e-HRMS प्रणालीमध्येच भरण्यात येणार आहे.

नवनियुक्त सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके ई – HRMS मध्ये भरणे शक्य नसल्यास त्यांची सेवा पुस्तके त्यांच्या सेवा नियमित करताना कोणत्याही परिस्थितीत e-HRMS प्रणालीमध्ये भरण्यात यावीत.

आता ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढला;सहा महिन्याचा फरक पण मिळणार! दि. 5/7/2023

महागाई भत्ता वाढ

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

2 thoughts on “Employees Service book : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक होणार ऑनलाईन ! शासन निर्णय निर्गमित”

  1. एकच विनंती आहे की जन्म तारखेची नोंद घेताना जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचे मानावे कारण पुर्वी निरक्षर पालकांनी आपल्या मुलांना शिकण्याची संधी दिली पण शाळेत प्रवेश घेताना जन्म प्रमाणपत्र नसल्याने अंदाजे तारीख लिहिल्या आहेत आणि नोकरी मिळाल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांनी जन्म प्रमाणपत्र काढले त्यांना बदलण्याची संधी द्यावी ही विनंती.

    Reply
  2. महाराष्ट्र सरकारने जन्म तारखेची नोंद सेवा पुस्तकात घेताना जन्म प्रमाणपत्राला महत्त्वाचे मानावे. पुर्वी शाळेत प्रवेश घेताना चुकीच्या तारखेची नोंद झाली आहे व अशा कर्मचाऱ्यांनी नोकरी लागल्यावर जन्म प्रमाणपत्र दिल्यानंतर जन्म नोंद सेवा पुस्तकात बदल करण्यासाठी संधी द्यावी आणि राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, सार्वजनिक उपक्रम, परिवहन, बृहन्मुंबई महानगरपालिका, महामंडळ, बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना व इतर सर्व कार्यालयांना एकच नियम लागू करण्यात यावा
    सेवा पुस्तकात जन्म नोंदणीसाठी
    सुधारित शासन निर्णय जिआर काढून नियम बदलावा ही विनंती.

    Reply

Leave a Comment