State employees : खुशखबर… या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनसाठी निधी प्राप्त! शासन निर्णय दि. 5/7/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State employees : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे जून २०२३ च्या वेतनासाठी, रा.प. महामंडळास माहे में २०२३ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी तसेच मे २०२३ मधील उत्पन्न व इंधन,वेतन, देखभाल दुरुस्ती खर्चातील तूट भरून काढण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,मुंबई यांनी संदर्भाधिन पत्रान्वये शासनास विनंती केली होती.

MSRTC employees updates

सन २०२३-२४ मध्ये गृह (परिवहन विभागाच्या २०४१ ००१८-३३ अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली केलेल्या तरतूदीमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे जून २०२३ च्या वेतनासाठी रु.३३.८२ कोटी व रा.प. महामंडळास माहे मे, २०२३ च्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रु.३२१.१८ कोटी असा एकूण रु.३५५.०० कोटी (अक्षरी रुपये तिनशे पंचावन्न कोटी फक्त) एवढा निधी रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर रु.३५५.०० कोटी हा खर्च सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च “मागणी क्रमांक बी-३, लेखाशिर्ष २०४१, चाहनांवरील कर (००) ००१, संचालन व प्रशासन (०१) परिवहन आयुक्त (०१) (०१) आस्थापना परिवहन आयुक्त, (दत्तमत्त) (अनिवार्य) (२०४१ ००१८) ३३, अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदरचे अर्थसहाय्य हे “बिनशर्त” आहे.

हे पण पहा ~  Retired employees : मोठी बातमी... आता 'या' सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची होणार करार पध्दतीने नेमणूक! मानधन तब्बल...

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान प्राप्त

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करावी.

शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.२८३/२०२३/व्यय-८. दि.२३.०६.२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३०७०५१५४६३८४७२९ आहे.

आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे आत्ताच पहा; नाहीतर 10 हजार दंड

आधार पॅन कार्ड लिंक

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment