Education news : राज्यांमधील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पाठ्यपुस्तकात असा करणार पानांचा सामावेश
इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक / पाठ / कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पृष्ठे (एक पान) जोडण्यात येतील.
पाठ्यपुस्तकातील वहिवर विद्यार्थ्यांकडून वर्गकार्यामध्ये शिक्षक शिकवत असताना / अध्यापन सुरूअसताना महत्त्वाच्या मुद्यांच्या नोंदी होणे जसे शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, महत्त्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्ये, टिपण इत्यादी अपेक्षित आहे.यामध्ये श्रुतलेखन / शुद्धलेखन नोंदवणे अपेक्षित नाही.
पाठ्यपुस्तकातील वहीवर काय लिहता येणार?
ही पाने “माझी नोंद” या सदराखाली मुलांनी वापरणे आवश्यक आहे.शाळेमध्ये शिक्षक प्रत्यक्ष काय शिकवतात याच्या नोंदी या पृष्ठांवर करण्यात येतील.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
यावरून वर्ग कार्याचा स्तर कसा आहे हे समजू शकते.आवश्यक तेथे या संदर्भाने सुधारणा होण्यासाठी सूचनाही करता आली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त सराव,वर्गकार्य, गृहपाठ इत्यादींसाठी मुलांनी वेगळ्या वह्या ठेवण्यास मुभा राहील.
आवश्यक तेथे या संदर्भाने सुधारणा होण्यासाठी सूचनाही करता येतील. पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त सराव, वर्गकार्य, गृहपाठ इत्यादींसाठी मुलांनी वेगळ्या पद्या ठेवण्यास मुभा राहील.
मोफत पाठ्यपुस्तकातील वही वापर कार्यपध्दती
राज्यातील सर्व शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय व अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी या इयत्तांकरीताची पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण ४ भागांमध्ये विभागून तयार करण्यात यावीत.
👉पाठ्यपुस्तक वही कार्यवाही संदर्भात अधिक माहिती येथे पहा👈
प्रत्येक घटक / पाठ / कविता यानंतर गरजेनुसार वहीचे १ पान समाविष्ट करण्यात यावे.इयता १ ली ची पाठ्यपुस्तके सुध्दा एकूण ४ भागांमध्ये तयार करण्यात येऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार सरावासाठी पृष्ठ समाविष्ट करण्यात यावीत. खाजगी आणि विना अनुदानित शाळांमधील इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तकें उपलब्ध करून देण्यात यावीत.
Free textbook scheme
पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला यापूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्याकडे असलेला साठा संपुष्ठात आल्यानंतर सदर पाठ्यपुस्तके एकूण ४ भागांमध्ये Free textbook scheme उपलब्ध करुन देण्यात यावीत.या पाठ्यपुस्तकांमध्येही वह्यांची पाने समाविष्ट करण्यात येणार आहे.
पाठ्यपुस्तक वही आजचा शासन निर्णय येथे डाऊनलोड करा