Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या  आहेत.

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना

 • आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
 • महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार – नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
 • मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
  राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

घरकुल योजना – सर्वासाठी घरे

यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’

प्रधानमंत्री आवास योजना : 4 लाख घरे

(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)

रमाई आवास 1.5 लाख घरे / 1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)

शबरी, पारधी, आदिम आवास 1 लाख घरे / 1200 कोटी रुपये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत : 50,000 घरे / 600 कोटी

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

( 25,000 घरे विमुक्त जाती भटक्या जमातींसाठी धनगर 25,000 घरे) – इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षात 10 लाख घरे / 12,000 कोटी रुपये ( या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार / 3600 कोटी रुपये)

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

 • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे.
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
 • प्रतिशेतकरी प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
 • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार – 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
 • रूपये 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
हे पण पहा ~  Old pension : आता कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावीच लागणार ! 14 मार्चपासून शासकीय कामकाज होणार ठप्प

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना

केवळ 1 रुपयांत पीकविमा आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून आता शेतकऱ्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा – 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.

संपूर्ण अर्थसंकल्प 2023 PDF येथे डाऊनलोड करा

अर्थसंकल्प 2023 PDF

Maharashtra Budget 2023 live

रेशनकार्ड धारकांना थेट रोखीने आर्थिक मदत मिळणार

विदर्भ,मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार आहे.

असंघटित कामगार/ कारागिर

 • टॅक्सी- ऑटोचालक,मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार – ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण,
 • माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी ,
 • स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार येणार आहे.
लेक लाडकी’ योजना महाराष्ट्र

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना खालील प्रमाणे मदत मिळणार आहे.

 • जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
 • पहिलीत 4000 रुपये
 • सहावीत 6000 रुपये
 • अकरावीत 8000 रुपये
 • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट मिळणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत मिळणार आहे. 

महाराष्ट्र अर्थसंकल्प नोकरदार संबंधित घोषणा येथे पहा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment