GState employees : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ व्या नियम १० (४) व नियम ६५ अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्ष अर्हताकारी सेवा यांपैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांचे सेवा पुनर्विलोकन करून त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे असे शासनाचे धोरण आहे.
Government employees news
सामान्य प्रशासन विभागाने सेवापुनर्विलोकना संबंधी कार्यपध्दती व सर्वसाधारण सूचना विहित केल्या आहेत.त्यास अनुसरून विद्युत निरीक्षणालयातील (१) गट-अ (राजपत्रित) (अतिकालीक वरीष्ठ श्रेणी) ग्रेड वेतन रु. १००००/- व त्यावरील (२) गट-अ (राजपत्रित) (वरीष्ठ वेतन श्रेणी) ग्रेड वेतन ७६०० व त्यापेक्षा अधिक परंतु १०००० पेक्षा कमी संवर्गातील अधिकारी (३) गट-अ (राजपत्रित) (कनिष्ठ वेतन श्रेणी) ग्रेड वेतन ७६०० पेक्षा कमी संवर्गातील अधिकारी तसेच (४) गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकारी यांच्या सेवापुनर्विलोकना करिता अ.मु.स./ प्रधान सचिव / सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा पुनर्विलोकन होणार
विद्युत निरीक्षणालयातील विद्युत निरीक्षक, गट-अ (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांचे सेवापुनर्विलोकन करण्यासाठीचा विहित प्रस्ताव मा.प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय पुनर्विलोकन समितीस चक्रीय पध्दतीने सादर करण्यात आला आहे.
विभागीय पुनर्विलोकन समितीने सदर अधिकाऱ्यांच्या सेवेचे मुल्यमापन करून केलेल्या शिफारशी नुसार ज्या अधिकाऱ्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सेवेत राहण्यासाठी पात्र ठरविले आहे त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सेवा पडताळणी सविस्तर माहिती व शासन निर्णय येथे पहा