ops strike leave : बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या दि. १४ मार्च ते २० मार्च, २०२३ या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी / अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते.
संप काळातील दिवसांचे अर्जित रजेत समायोजन
दि. २८ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये “असाधारण रजा” म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी “असाधारण रजा” ऐवजी “अर्जित रजा” म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ ते २० मार्च,२०२३ या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले होते, त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पुर्वोदाहरण होणार नाही या अटीवर “असाधारण रजा ” ऐवजी “अर्जित रजा” करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
संप काळातील दिवस अर्जित रजेत बाबत शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
संपकाळातील अर्जित रजा मंजूर, खूप चांगली बातमी आहे.