HMaharashtra HSC Result 2023 LIVE: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या (12th Result) निकालाची जाहीर झाला आहे. साहजिकच या परीक्षेला बसलेले लाखो विद्यार्थी आणि त्याच्या पालकांचे सारे लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
HSC Maharashtra Results 2023 Date and Time
शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये, बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.परीक्षेसाठी एकूण 14,57,293 उमेदवार – 7,92,780 मुले आणि 6,64,441 मुलींनी नोंदणी केली होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ (MSBSHSE) 25 मे रोजी दुपारी 2 वाजता इयत्ता 12वी किंवा HSC परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे.
HSC Maharashtra online Results 2023
HSC विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात mahresult .nic.in, hscresult.mkcl.org, hsc.mahresult.org.in आणि msbshse.co.in.
HSC Board Examination कडून आलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की निकालांवर समाधानी नसलेले विद्यार्थ्यांना verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर
लाख 16 हजार 371 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची टक्केवारी 91.25 एवढी आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल 96.01 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.73 टक्के असून मुलांचा निकाल 89.14 टक्के एवढा आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 4.59 टक्के जास्त आहे.
शाखानिहाय निकाल
- विज्ञान – 96.9 टक्के
- कला – 84.5 टक्के
- वाणिज्य – 90.42 टक्के
- व्यवसाय अभ्यासक्रम – 91.25 टक्के
विभागानुसार निकाल
- पुणे: 93.34 टक्के
- नागपूर: 90.35 टक्के
- औरंगाबाद : 91.85 टक्के
- मुबई: 88.13 टक्के
- कोल्हापूर : 93.28 टक्के
- अमरावती: 92.75 टक्के
- नाशिक : 91.66 टक्के
- लातूर: 90.37 टक्के
- कोकण: 96.01 टक्के
बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा