Soybean variety : सोयाबीनला मागील दोन वर्षांमध्ये विक्रमी भाव मिळाले तसेच इतर पिकांच्या तुलनेत मेहनत आणि खर्च खुप कमी लागत असल्याने महाराष्ट्रामध्ये शेतकरी सोयबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे.आज आपण सोयबीन च्या प्रगत आणि सर्वोत्तम वाण (best soybean variety) कोणते याविषयी माहिती या लेखात पाहणार आहोत.
सोयाबीन चांगले वाण
MAUS – 612
दर्जेदार बियाणे, इतर जातीच्या तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते
MAUS – 158
एकरी अधिक उत्पादन देणारे सोयाबीन वाण,काढणी वेळेस शेंगा फुटण्याचे प्रमाण सगळ्यात कमी
MAUS – 162
सरळ व उंच वाढणारे ,तसेच अधिक एकरी उत्पादन देणारे वाण,काढणी यंत्राने काढण्यासाठी सगळ्यात चांगले वाण
DS- 228 फुले कल्याणी
राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण.
अधिक उत्पादन देण्याची क्षमता असणारे वाण.उशिरा येणारे असून पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी पेरणीसाठी उपयुक्त.
KDS-344 फुले अग्रणी
राहुरी विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट उत्पादन देणारे सोयाबीन वाण,शेंगा गळत नाहीत
फुले संगम KDS 726
राहुरी कृषि विद्यापीठाचे आणखीन एक सर्वोधिक एकरी उत्पादन तसेच काढणीच्या वेळेस शेंगा न फुटणारे, ,रोगास प्रतिबंधक.
फुले किमया KDS 753
100-105 दिवसात लवकर काढणीस येणारे वाण,अधिक उत्पादनक्षम, येलो मोझेक प्रतिकारक,काढणी वेळेस शेंगा फुटणे प्रमाण कमी
फुले दुर्वा KDS 992
2021 वर्षात प्रसारित वाण, टपोरे दाणे कमी दिवसात म्हणजेच 100-105 दिवसात तयार होते,इतर वाणापेक्षा प्रती हे 6 क्विंटल अधिक उत्पादनक्षमता, पाने खाणारीअळी प्रतिकार क्षम,तांबेरा रोगास सहनशील
JS-9705
महाराष्ट्र साठी शिफारस,70-75 दिवसात येणारे ,तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते
JS-9305
महाराष्ट्र साठी शिफारस, 90 -95 दिवसात लवकर येणारे वाण,अधिक उत्पादनासाठी ,रोग व किडीस कमी बळी पडणारे सोयाबीन वाण
टिप :- नवीन वाण प्रसारित करताना शास्त्रज्ञ अनेक चांगले गुणधर्म घेऊन नवीन वाण प्रसारित करतात परंतु स्थानिक हवामान व इतर पिकाच्या उत्पादनावर परिणाम करणारे अनेक घटक हे पिकाच्या उत्पादकतेस कारणीभूत ठरत असतात.