Cotton Market : जगात खरच आपला कापूस महाग आहे का? कोण पाडतय कापूस बाजार भाव?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton : कापड उद्योगाने भारतातले  कापूस बाजार भाव जास्त असल्याचे सांगत आयातशुल्क काढण्याची मागणी लावून धरली आहे.केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. त्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामण विविध उद्योगांच्या शिष्टमंडळांच्या भेट घेऊन अर्थमंत्र्यांकडे कापसावरील आयातशुल्क रदद् करण्याची मागणी केली.

MCX cotton market news

कापूस बाजार भावाची नेहमी वायद्या बाजाराशी तुलना केली जाते.खर पाहता सध्या भारतातील कापूस आंतरराष्ट्रीय दरापेक्षा स्वस्त झाला.देशात सध्या कापूस खंडीचे भाव सरासरी 61 हजार 500 रुपयांवर आहेत.एक खंडी 356 किलोची असते.

क्विंटलमध्ये रुईचा भाव 17 हजार 275 रुपये होतो.काॅटलूक ए इंडेक्स काल 101.06 सेंट प्रतिपाऊंड होता.रुईचा भाव 18 हजार 166 रुपये क्विंटल होतो.म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचा भाव देशातील भावापेक्षा 891 रुपयांनी जास्त आहे.

हे पण पहा ~  Land record : वर्षानुवर्षे च्या जमीनीचे वाद मिटवा फक्त 2 हजार रुपयात! पहा पात्रता अटी आणि GR

कापूस बाजार भाव 2023

उद्योगांकडून आयातशुल्क काढण्याची मागणी केली जात आहे. पण सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. सरकारने यापूर्वी दोनदा ही मागणी फेटाळली.आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा भारतीय कापूस महाग असल्याने निर्यात घटल्याचे सांगितले जात होते.

पण आता ही परिस्थिती बदलली असून पुढील काळातही भारतीय कापसाला मागणी वाढू शकते,असा निर्यातदारांचा अंदाज आहे.

अमेरिका,पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये कापसाचे उत्पादन घटलेले आहे.त्यामुळे भारतीय कापसाला उठाव मिळू शकतो.त्यामुळे कापसाच्या दराला आधार मिळून कापूस बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment