Vihir Anudan yojana : नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु! पहा पात्रता व लगेच येथे करा अर्ज 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vihir Anudan : कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदून दिल्यास ते शेतकरी पिकांना पाणी देऊन जास्त उत्पन्न मिळवू शकतात. तसेच विहिरीच्या पाण्याच्या भरोशावर अनेक प्रकारचे पिके घेऊ शकतात.

नवीन विहीर अनुदान योजना

आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये नवीन विहिरीकरिता बांधकाम करायचे असेल त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने नवीन विहीर अनुदान योजना अंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्याकरिता 2.50 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर अर्ज सुरू झालेले आहेत.

महाराष्ट्र शासन आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या व त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट व्हावी या उद्देशाने ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवित आहे.

महाराष्ट्र शासन वेळोवेळी नवीन विहिरी करिता अनुदान देत आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्यात धडक सिंचन विहीर योजना राबवण्यात आलेली होती. तसेच पोखरा योजनेअंतर्गत विहीर योजना व मनरेगाच्या अंतर्गत विहीर योजना या योजना सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत.

Vihir Anudan पात्रता

 • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
 • लाभार्थ्याने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
 • लाभार्थ्याच्या जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक राहील.
 • वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लक्ष रुपयाच्या मर्यादेत असावी.
 • लाभार्थीला उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत लाभार्थीची जमिनधारणा (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर मर्यादा आहे) असणे बंधनकारक आहे.
हे पण पहा ~  Gharkul Yojana : ओबीसींसाठी नवीन घरकुल योजना! पह पात्रता आणि लगेच करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे

 • अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
 • जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा.
 • रु. 1,50,000/- पर्यंतचे तहसीलदार यांचेकडील वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
 • 100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
 • लाभार्थी जर अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र.
 • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत) विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं., नकाशा व चतु:सीमा.
 • पाणी उपलब्धतेचा दाखला.
 • कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र.
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
 • विहिरीच्या जागेचा फोटो

सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज येथे करा

विहीर अनुदान अर्ज

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment