Money time : आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी माणूस सदैव गुंतवणूक करत असतो.अशावेळी बँक फिक्स डिपॉझिट(FD),पोस्टातील RD किंवा नवीन पर्याय आलेला आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP इत्यादी पर्याय आपल्या सरकारी कर्मचारी तसेच सर्वच क्षेत्रातील व्यक्तींसमोर असतात.आता या सर्वांमध्ये कोणते गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची होईल याची माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत तर बघूया सविस्तर माहिती
Post office Recurring Deposit
आपण जर RD मध्ये गुंतवणूक एकदा सुरू केली असेल, तर तुम्हाला सलग 5 वर्षे दरमहा ठराविक रकमेचा हप्ता भरावा लागेल.आपण यातून मुदतपूर्तीपूर्वी रक्कम काढू शकत नाही.खाते उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर तुम्ही ते कधीही बंद करू शकता, येथे तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार त्यावर व्याज दिले जाते.
SIP investment benefits
SIP द्वारे तुम्ही शेअर बाजारात जी काही रक्कम गुंतवली असेल, त्या रकमेवर त्यावेळी जे काही व्याज असेल,त्या व्याजासह एकूण रक्कम परत केली जाईल.आपणास जर sip hold करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता.तुम्ही ते कधीही पुन्हा सुरू करू शकता.
सरकारी कर्मचारी महागाई भत्ता, वेतन आयोग, शासन निर्णय, सरकारी योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा
एसआयपी होल्ड केलेल्या काळात हप्ता भरला नाही तरी सुद्धा त्यासाठी कोणताही दंड बसणार नाही.एसआयपीमध्ये काही कारणास्तव तुम्ही 5 वर्षे सतत गुंतवणूक करण्याच्या स्थितीत नसल्यास, केव्हाही sip बंद करू शकता आणि रक्कम काढू शकता.
आता FD, RD, SIP मध्ये कोणत्या गुंतवणूकीत जास्त नफा मिळतो येथे कॅल्क्युलेटर वर पहा