OPS committee : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे.सदर समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत जुनी पेन्शन हक्क संघटना व इतर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
ops committee Maharashtra
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारला होता.जुनी पेन्शन मागणीसाठी राज्यातील तीन प्रमुख संघटना राजपत्रित अधिकारी महासंघ,राज्य मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांची पहिली बैठक 21 एप्रिल रोजी पार पडली होती.जुनी पेन्शन मागणी साठी प्रस्ताव संदर्भात नवीन अपडेट्स समोर आली आहे.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या जुनी पेन्शन अभ्यास समितीसमोर सर्व आस्थापनेतील संघटनेला संमत होईल असा प्रस्ताव समितीस सादर करायचा आहे.दिनांक 09 मे 2023 रोजी जुनी पेन्शन अभ्यास समितीस अहवाल सादर करण्यात येणार आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार संदर्भाधीन शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे. प्रस्तुत समितीस दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस / अहवाल शासनास सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
ops committee updates
दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यांनतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरीता दिनांक २१/०४/२०२३ रोजी समितीचे सदस्यासमवेत आपली बैठक पार पडली होती.
सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संघटनेस अधिकची माहिती द्यावयाची असल्याने जुनी पेन्शन हक्क संघटना व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा निमंत्रित करण्यात आले आहे.
यासाठीची बैठक दिनांक ०९/०५/२०२३ मंगळवार रोजी ६.३० वाजता कक्ष क्र.५, सातवा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
जुनी पेन्शन अभ्यास समिती निमंत्रण पत्रक येथे पहा