EPFO Insurance : जर तुम्ही EPFO योजने अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर आपल्यासाठी दिलासादायक बातमी आहे. ईपीएफओ योजनेत गुंतवणुक खातेदारांना 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. ज्यासाठी त्यांना कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही.
EPFO Account Holders Insurance
जर आपण EPFO अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही तीन योजना चालवते आहे.
- १९५२ ची EPF योजना
- १९७२ ची EDLI योजना
- १९९५ ची EPS पेन्शन योजना
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व संस्था EDLI लाभांसाठी नोंदणीकृत आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना निधी योजनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे अकाली निधन झाल्यास कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना ७ लक्ष रुपयांचे मृत्यू विमा प्रदान करण्यात येतो.
विमा आवश्यक कागदपत्रे
कर्मचाऱ्यांचे अकाली निधन झाल्यास नामनिर्देशित व्यक्तींना पीएफ,पेन्शन काढणे आणि EDLI दाव्यांसाठी संयुक्त दावा फॉर्मद्वारे भरणे आवश्यक आहे.
नामनिर्देशित व्यक्तीकडे कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.याशिवाय रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बॅंक डिटेल्स साठी कॅन्सल चेकही जोडावा लागतो.
सेवानिवृत्तीनंतर लाभ नाही
PF योजना विम्यावर केवळ पीएफ खातेधारकाचा मृत्यू नोकरीदरम्यान म्हणजेच निवृत्तीपूर्वी झाला असेल तेव्हाच दावा केला जाऊ शकतो.नोकरी दरम्यान कर्मचारी कार्यालयात काम करत असेल किंवा रजेवर असो नॉमिनी पैशाचा दावा करू शकतो.
आपल्या GPF खात्यातील रक्कम ऑनलाईन येथे चेक करा