Insurance Scheme : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी व निंजा सरकारी कर्मचारी यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय नुकताच निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयाद्वारे कर्मचाऱ्यांना विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे. तर बघूया संबंधित शासन निर्णयातील पात्रताला, नियम आणि मिळणारे लाभ सविस्तर माहिती
समूह वैयक्तिक अपघात विमा योजना
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता संपूर्णतः कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारित अशी “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” दि.०४.०२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास दि. १८.०२.२०१७ च्या शासन निर्णयान्ये मान्यता देण्यात आली होती.
राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व निमशासकीय कार्यालय,जिल्हा परीषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत,महानगरपालीका,नगरपालीका,नगरपरिषदा, नगरपंचायत,शासकीय महामंडळे, मंडळे,सार्वजनिक उपक्रम,सांविधानिक संस्था,मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था/महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, पारंपारिक विद्यापीठे यांच्या अधिकारी/कर्मचारी यांना लागू करण्यात आली आहे.
Employees Accident Insurance Scheme
अपघात विमा योजनेखाली गट-अ ते ड मधील अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता रु.३००/- इतक्या अत्यल्प वर्गणीमध्ये रुपये १०.०० लाख ही समान राशीभूत विमा रक्कम निश्चित करण्यात आलेली होती.
सरकारी कर्मचारी / अधिकाऱ्यांचा आर्थिक स्तर, सातवा वेतन आयोगामुळे वेतनात झालेली भरीव वाढ,महागाई निर्देशांक इत्यादी बाबी विचारात घेता,योजनेची वर्गणी व अपघात विमा राशीभूत रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचारी अपघात विमा योजना सविस्तर माहिती व शासन निर्णय येथे पहा
दि. ०१ एप्रिल २०२३ पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sum Insured) यामध्ये वाढ करण्यात येत असून व सदर वर्गणी व राशीभूत रक्कम खालीलप्रमाणे गटनिहाय निर्धारित करण्यात येत आहे.
सरकारी कर्मचारी अपघात विमा रक्कम व नियम येथे पहा