7th pay arrears : सातव्या वेतन आयोग थकबाकीची संदर्भात महत्त्वाची अपडेट्स आली असून विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचा- यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
सातवा वेतन आयोग फरक
विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम २०२१-२२ या वित्तीय वर्षापासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यांमध्ये दरवर्षी १ जुलै रोजी देण्यात येईल. त्यानुसार २०२१-२२ व २०२२-२३ मधील दोन वर्षी द्यावी लागणाऱ्या रक्कमेचे हप्ते व सन २०२३ २४ हप्ता एकत्रितपणे १ जुलै, २०२३ रोजी देण्यात येईल.
7th pay commission updates
राज्य सरकारला सातव्या वेतन आयोग थकबाकीची रक्कम देण्यासाठी ९०० कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय नुसार ऑफलाईन काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
शालार्थ प्रणालीमध्ये नोंद घेण्यात येईल, तसेच उपलब्ध तरतूद 100% खर्च होईल, याची दक्षता घेण्याचा सुचना दिल्या आहेत.
1 thought on “7th pay arrears : मोठी बातमी… या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार! शासन निर्णय आला”