7th pay arrears : विधान परिषद सदस्य सुधाकर अडवाले व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या कडून शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहीला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती.
सातवा वेतन आयोग हप्ता
मा.शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडून खालील माहिती देण्यात आली आहे.सन २०२३ – २४ मध्ये लेखाशिर्ष २२०२०९७३ /३६ अंतर्गत रक्कम रू. २१४८७,४३,०३,०००/- (अक्षरी रक्कम रू. एकवीस हजार चारशे सत्याऐशी कोटो बेचाळीस लाख तीन हजार फक्त) इतकी तरतूद नियमित शिक्षकांच्या वेतनासाठी मंजूर आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय देयके अदा करणेसाठी रक्कम रू.२६०,५९,८८,०००/-, रजा प्रवास सवलत अदा करणेसाठी रक्कम रू. २३,७४,१६,०००/-, थकीत देयके अदा करणेसाठी रक्कम रु. १२८,२०,४५,०००/-, सातव्या वेतन आयोगाचा पहीला हप्ता अदा करणेसाठी रक्कम रू. ९६,९७,२६,०००/-, दुसरा हप्ता अदा करणेसाठी रक्कम रू. ८९३,७०,५९,०००/- तिसरा हप्ता अदा करणेसाठी ९६६,४५,६५,०००/- चौथा हप्ता अदा करणेसाठी रक्कम रु. ११५०,००,००,०००/- व इतर देयके अदा करणेसाठी रक्कम रू. ८४,७०,७१,०००/- इतक्या जास्तीच्या तरतूदीची आवश्यकता आहे.
Government employees 7th pay arrears
सातव्या वेतन आयोगाच्या थकित हप्त्यासंदर्भात अधिवेशनामध्ये रक्कम रू.३५०४,३८,७०,०००/- इतक्या तरतूदीची पुरवणी मागणी संचालनालयकडून शासनास करण्यात येणार असून पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर सोबतच्या विवरणपत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषदांना मंजूर तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सातवा वेतन आयोग फरक शासन परिपत्रक येथे पहा