Employees Applicable leave : दिलासादायक.. DCPS-NPS धारक कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण होणार! शासन परिपत्रक निर्गमित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Applicable leave : DCPS NPS धारक सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त / राजीनामा / नोकरी सोडल्यास /निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा ,रजा , सुधारणा नियम, 2016 मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

अर्जित रजा रोखीकरण शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2005 पत्रानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजीच्या शासन निर्णयान्वये 2005 नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व नियत वयमान सेवानिवृत्ती/ मृत्यू इ.कारणाने कर्मचाऱ्यांची शासकीय सेवा समाप्त झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासन स्तरावरुन योग्य कार्यवाही होण्यासंदर्भात सुचना करण्यात आलेली आहे.  

शासन निर्णयातील परिच्छेद 5 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्ती होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृती वेतन योजना लागू असणार आहे.

हे पण पहा ~  Application leave : कर्मचाऱ्यांचे अर्जित रजेचे रोखीकरण संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित! आता मिळणार रोख ...

म्हणजेच सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतन योजना महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा सध्या अस्तित्त्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही.

Earn cash on Applicable leave

सदरील शासन निर्णयान्वये 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्ती होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम, 1981 लागू होणार नसल्याबाबत कोणतेही आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत.

सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम, 1981 हे जसेच्या तसे लागू आहे.थोडक्यात एनपीएस किंवा डीसीपीएस धारक सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार आहे.

अर्जित रजे रोखीकरण शासन परिपत्रक येथे डाऊनलोड करा

अर्जित रजा रोखीकरण

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment