7th pay7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने अलीकडेच घेतला होता.यासोबतच आगामी काळात सरकार पुन्हा एकदा तीन भत्ते वाढविण्याच्या तयारीत आहे.
Central Government allowances
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि डीएच्या आधारे केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते,असे म्हटले जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून सातव्या वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता शहर भत्ता वाढवण्यात येणार आहे.यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे.
DA Hike new updates
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार दर 6 महिन्यांनी DA वाढ होते. 24 मार्च 2023 रोजी,जानेवारी 2023 चा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता आता 42% झाला आहे.गेल्या वर्षी जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीतील CPI-W डेटा वापरून ही वाढ मोजण्यात आली.तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या दराने महागाई वाढली आहे त्यानुसार महागाई भत्ता आणखी 4% वाढेल.
House Rent hike news
मोदी सरकार लवकरच HRA वाढवू शकते.2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकार घरभाडे भत्ता वाढवू शकते.जर महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला,तर अशा परिस्थितीत सरकार एचआरएमध्ये सुधारणा करू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 42 % आहे.
जुलै 2021 मध्ये,जेव्हा केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 25 टक्क्यांच्या पुढे गेला होता,त्यानंतर सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती.कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा सरकार पुन्हा एकदा HRA मध्ये सुधारणा करणार आहे.सरकार यावेळी घरभाडे भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करणार आहे.