Asadharan Raja : असाधारण रजेचे नियम महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार असाधारण रजा म्हणजेच कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय नसेल किंवा इतर प्रकारच्या रजा अनुज्ञेय असताना देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली असेल तरच ही रजा मंजूर करता येत असते.
असाधारण रजा म्हणजे काय?
असाधारण रजा ही शासकीय कर्मचारी यांनी मंजूर झाल्यावरच त्याचा उपयोग घ्यावा.अधिकारी (रजा मंजूर करणारा अधिकारी) जो पर्यंत रजा मंजूर करत नाही.तो पर्यंत रजेवर जाता येत नाही. म्हणून रजेवर कर्मचाऱ्यांचा हक्क नाही. रजा मंजूर झाली तरी रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकारी कधीही बोलवू शकतो. रजेचे प्रकार आहे. त्या प्रमाणे रजा मंजूर करण्यात येते.
असाधारण रजा नियम 63
असाधार रजामध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता ते मात्र घरभाड्यावर त्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतो आहे असे प्रमाणपत्र सक्षम अधिका-यांना देणे आवश्यक आहे.शा. नि. दि.4/9/2000. याबाबतची खात्री सक्षम अधिका-याने करणे गरजेचे असून त्यांचे समाधान झाल्यावर सदर फायदा देता येतो.
असाधारण रजा वेतन नियम
असाधार रजामध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता ते मात्र घरभाडयावर त्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतोय असे प्रमाणपत्र सक्षम अधिका-यांना देणे गरजेचे आहे. शा. नि. दि.4/9/2000.याबाबतची खात्री सक्षम अधिका-याने करणे गरजेचे असून त्यांचे समाधान झाल्यावर सदर फायदा देता येतो.
- कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल किंवा असताना देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली तरच ती रजा मंजूर करता येते.
- कायम सेवेतील सरकारी कर्मचा-याला कोणत्याही प्रकारची रजा वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत नाही.
- अस्थाई कर्मचा-याला ही रजा खालील मर्यादेर्यंत मंजूर करता येते.
- कोणत्याही कर्मचाऱ्यांना – वैदयकीय प्रमाणपत्राशिवाय – 3 महिने.
- तीन वर्षाच्या सेवेनंतर -वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे 6 महिने.
- पाच वर्षाच्या सेवेनंतर – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे 12 महिने.
- एक वर्षाच्या सेवेनंतर – कर्करोग, मानसिक रोग यासाठी – 12 महिने
- एक वर्षाच्या सेवेनंतर – क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी – 18 महिने
- तीन वर्षाच्या सेवेनंतर – लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी – 24 महिन्यांपर्यंत
असाधारण रजा शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
1 thought on “Employees Asadharan Raja : महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार असाधारण रजा म्हणजे काय? पगार मिळतो का?”