Kusum solar pump : आनंदाची बातमी नवीन कुसुम सोलर पंप कोठा आला;पहा जिल्हावार यादी व लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum solar pump :केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023

अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.

२.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५  HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 वैशिष्ट्ये

पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.

हे पण पहा ~  DA Hike Cabinet Meeting : शेवटी ठरले! 'या' दिवशी होणार महागाई भत्ता वाढ! पहा किती वाढणार पगार?

शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० % तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ % लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

Kusum Yojana Documents

  • ७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत.
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
  • पोर्ट आकाराचा छायाचित्र.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

कुसुम सोलर योजना अर्ज सुरू जिल्ह्याची यादी पहा

कुसुम योजना अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment